
Nashik Election : नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत 16 उमेदवार रिंगणात
Continues below advertisement
नाशिक पदवीधर निवडणुकीतला ट्विस्ट काही काही केल्या संपत नाहीए... आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी देखील नेमकं कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार आणि कुणाला कुठल्या पक्षाचा पाठिंबा हेच चित्र स्पष्ट होतं नव्हतं... अखेर साडेतीननंतर याबाबतचा सस्पेन्स संपला आणि नाशिक पदवीधर निवडणुकीत तिहेरी लढत होणार हे स्पष्ट झालं... काँग्रेसविरोधात बंड केलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंविरोधात ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील अशी लढत असणारेय... पण ठाकरे गटात देखील दोन मतप्रवाह असल्याची माहिती समोर आली... ठाकरे गटात अपक्ष उमेदवार सुभाष जंगले आणि शुभांगी पाटील यांच्यात पाठिंबा देण्यावरुन दोन मतप्रवाह असल्याचं समोर आलं... पण अखेर ठाकरेंनी शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला...
Continues below advertisement