Nashik Election : शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावरुन ठाकरे गटात 2 मतप्रवाह
नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या... ठाकरे गटानं शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र सध्या शुभांगी पाटील नॉट रीचेबल असल्यामुळे अनेक तर्क वितर्कांना उधाण आलंय... शेवटी अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर शुभांगी पाटील विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाल्या... यावेळी त्यांनी आपली उमेदवारी कायम असल्याचं म्हंटलं.. दरम्यान शुभागी पाटील यांना पाठिंबा देण्यावरुन ठाकरे गटात दोन मतप्रवाह आहेत..
शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याऐवजी सुभाष जंगले यांना पाठिंबा द्यावा.. अशी मागणी ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केलीए..