MNS Andolan | सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी मनसेचं आंदोलन | ABP Majha
पिंपरीत पाणीपुरवठा योग्य व्हावा या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड मनसे महिला अध्यक्षांनी शोले स्टाईल आंदोलन केलं. अश्विनी बांगर यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढल्यानं महापालिका आणि पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारं धरण तुडुंब आहे, मात्र अधिक दाबानं पाणी देण्याचं कारण पुढे करत पाणीकपात करण्यात आलीए. मात्र, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे परिस्थिती अजूनही जैसे थेच असल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.त्यामुळे अश्विनी बांगर या थेट पाण्याच्या टाकीवर चढल्या.