MNS Protest Washi : वाशीच्या हॉटेलमध्ये मनसेचा राडा, गैरसमजातून वाद, हॉटेल मालकाचा दावा
नवी मुंबईत वाशी इथल्या द टेस्ट ऑफ पंजाब हॉटेलच्या व्यवस्थापकाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केलीय.. हॉटेलमध्ये मराठी गाणी लावण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली होती. मात्र याकडे हॉटेल व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेने केलाय.. तसंच हॉटेल व्यवस्थापकाने उडवाउडवीची उत्तर दिल्याचा आरोपही मनसेकडून करण्यात आलाय.. या घटनेनंतर हॉटेल मालकाने याबाबत दिलगिरी व्यक्त केलीय.. गैरसमजातून हा वाद झाल्याचं स्पष्टीकरण हॉटेल मालकाने दिलंय..
Tags :
Hotel Vashi Marathi Songs Navi Mumbai Apologies Arguments The Taste Of Punjab Beating By MNS Workers Misunderstandings