Vidarbha Temperature: विदर्भात तापमान वाढलं, अकोल्यात पारा 38.5 अंशावर ABP Majha
Maharashtra Weather : फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा जेमतेम सुरु झाला असला तरी विदर्भात (Vidarbha) अनेक ठिकाणी कमाल तापमानात (Temperature) वाढ झाली आहे. अकोल्यामध्ये (Akola) तर पारा फेब्रुवारीमध्येच 40 अंश सेल्सिअसपर्यंत जातो की काय अशी परिस्थिती आहे. अकोल्यात 38.5 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली असून गेल्या दहा वर्षातील अकोल्यात फेब्रुवारी महिन्यातील कमाल तापमानाचा हा उच्चांक आहे. नागपुरातही (Nagpur) पारा 38 अंशापर्यंत पोहोचला आहे. अकोला आणि नागपूरसह सर्वच जिल्ह्यात सध्या कमाल तापमान सामान्यापेक्षा तीन ते चार अंश जास्त आहे. त्यामुळे दिवसा उन्हाळ्यात होते त्याच पद्धतीने अंगाची लाहीलाही होणे सुरु झालं आहे.