Vidarbha Farmers Protest : विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस
abp majha web team
Updated at:
11 Mar 2024 02:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सामूहिक उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. आज प्रकल्पग्रस्त अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले. मात्र जिल्हाधिकारी नसल्याने आंदोलक संतप्त झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. जमिनीचा वाढीव मोबदला तसंच सरकारी नोकरी देण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. ५० पेक्षा अधिक वृद्ध शेतकरी आमरण उपोषणाला बसले असून अनेकांची प्रकृती खालावली आहे. आज ७० वर्षीय वृद्धेची प्रकृती खालावल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान यापूर्वीही या शेतकऱ्यांनी अमरावती ते नागपूर हिवाळी अधिवेशनावर लॉन्ग मार्च काढला होता. शिवाय त्यांनी अजित पवारांचा ताफाही अडवला होता.