Sana Khan Nagpur : सना खान मृत्यू प्रकरण सेक्सटाॅर्शनच्या वळणावर !
abp majha web team
Updated at:
21 Aug 2023 10:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSana Khan Nagpur : सना खान मृत्यू प्रकरण सेक्सटाॅर्शनच्या वळणावर ! सना खान हत्येला आता सेक्सटॉर्शनचं वेगळंच वळण लागतंय. नागपूर पोलिसांनी या प्रकरणी अमित साहूसह त्याच्या काही अज्ञात साथीदारांवर आणखी एक गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात अमित साहू आणि त्याचे नागपूर तसेच बलपूरमधील काही साथीदार सना खान यांच्यावर दबाव आणून त्यांना काही लोकांकडे पाठवत होते. त्यानंतर अश्लील छायाचित्र आणि व्हिडिओच्या माध्यमातून संबंधित लोकांना ब्लॅकमेल करून पैसे उकळत होते, असा आरोप ठेवण्यात आला आहे.