Naresh Badole | शहीद जवान नरेश बडोले यांच्यावर नागपुरातील डिगडोह येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
रजत वशिष्ठ, एबीपी माझा
Updated at:
25 Sep 2020 12:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफचे एक जवान शहीद झाले आहे. त्यांचे नाव नरेश उमराव बडोले असून ते 49 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात कुटुंबात त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत.
गेले अनेक वर्ष सीआरपीएफमध्ये असलेले नरेश बडोले सध्या जम्मू काश्मीर मध्ये वजीरबाग, श्रीनगर येथे तैनात होते. नरेश बडोले आज सकाळी त्यांच्या ड्युटीवर असताना अचानक दहशतवाद्यांनी घात लावून हल्ला केला. तिथे असलेल्या सीआरपीएफ जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रतिउत्तर दिले आणि दहशतवाद्यांचा हल्ला अपयशी केला. मात्र, या चकमकीत नरेश बडोले सर्वात पुढे असताना त्यांना गोळी लागली. ते जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. तिथे त्यांची प्राणज्योत मालवली.