Ajit Pawar at Pune Metro | अजित पवारांचा पुन्हा एकदा सकाळी 6 वाजता दौरा, मेट्रो अधिकाऱ्यांची तारांबळ
पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा पुणे महामेट्रोच्या कामाची पाहणीसाठी सकाळी-सकाळीच दौरा केला. सकाळी सहा वाजताची वेळ दिलेले पवार पावणेसहा वाजताच पोहचले. त्यामुळे महामेट्रोच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. गेल्या शुक्रवारी पिंपरी चिंचवडमधील तर आज पुणे स्टेशनजवळील कामाचा पवारांनी आढावा घेतला. कोरोना काळात मेट्रो काम बंद होतं तेव्हा कामगार घरी गेले होते, ते कामावर आले आहेत का? तसेच पुणे मेट्रोसाठी सर्व जागा संपादित आहे का याची माहिती त्यांनी घेतली. खरंतर मेट्रोची माहिती ही आठ वाजेपर्यंत घेणं अपेक्षित होतं पण अर्ध्या तासाच्या आतच त्यांनी सर्व आटोपलं.