Nagpur | स्पेशल रिपोर्ट | मंत्री असताना कोट्यवधींचा निधी दिला, आता घाणीत राहण्याची वेळ
सरकारी कार्यालयांमध्ये सामान्य नागरिकांचे कामं होत नाही. मात्र, त्याच वेळी राजकीय नेत्यांची कामं चटकन होतात.असाच सर्वसामान्यांचा अनुभव असतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा एका राजकीय नेत्याची व्यथा सांगणार आहोत, जो आपल्या एका छोट्याश्या कामासाठी नागपूर महापालिकेच्या चकरा मारून मारून दमला आहे, हताश झाला आहे. अवघ्या तीस फुटाच्या सीवर/गडर लाईनसाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका माजी मंत्र्याला जेरीस आणलं आहे.
यशवंत निकोसे. बहुजन समाज पक्षाचे खंदे कार्यकर्ते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी. युवा अवस्थेत कांशीराम यांच्यापासून प्रभावित झाल्यानंतर यशवंत निकोसे यांनी घरदार, नोकरी आणि कला-नाट्य क्षेत्रातील त्यांचं करिअर सर्व काही त्यागून बहुजन समाज पक्षासाठी काम सुरु केलं होता. कांशीराम यांच्या विचारांप्रती त्यांची निष्ठा पाहूनच मायावती यांनी आधी यशवंत निकोसे यांना राज्यपाल नियुक्त आमदार बनविले आणि नंतर स्वतःच्या मंत्रिमंडळात यशवंत निकोसे यांना सांस्कृतिक विभागाची स्वतंत्र जबाबदारी सोपविली होती.