Vidhan Parishad Election Result : पदवीधर , शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा आज निकाल

Continues below advertisement

Vidhan Parishad Election Result : पदवीधर , शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा आज निकाल  नाशिक शिक्षक मतदार संघाचा निकाल आज जाहीर होणार आहे. नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक महायुतीकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी मतदारसंघात बैठका घेऊन मोर्चे बांधणी केली होती. महायुतीने दोन उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयाचा मार्ग सोपा असेल या अशी परिस्थिती असताना महायुतीने किशोर दराडे हेच एकमेव महायुतीचे उमेदवार असल्याची घोषणा केली. विरोधकांकडून निवडणुकीत किशोर दराडे यांच्यावर पैसे वाटण्याच्या आरोप देखील करण्यात आले होते. त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राज्यभर चर्चेत आली होती. निकालाच्या दिवशी महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी घरात देवदर्शन केले आणि कुटुंबियांकडून किशोर दराडे यांचे औक्षण करण्यात आले. किशोर दराडे यांनी पहिल्याच फेरीत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram