Worli Jambori Maidan : भाजपकडून जांबोरी मैदानात क्रीडा महाकुंभाचं आयोजन
Worli Jambori Maidan : भाजपकडून जांबोरी मैदानात क्रीडा महाकुंभाचं आयोजन आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात भाजपकडून ठाकरे गटाला धोबीपछाड देण्याची तयारी सुरु झाली आहे. तरुण खेळाडूंना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत 'श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ' स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेचं उद्घाटन २६ जानेवारीला वरळीतील जांबोरी मैदान इथे होणार आहे.