BMC Councillor : मुंबई महानगर पालिकेतील स्विकृत नगरसेवकांची संख्या 5 ने वाढवली

Continues below advertisement

मुंबईसह राज्यातल्या विविध महापालिका निवडणुका तोंडावर आल्याचे संकेत आता दिसू लागले आहेत. मुंबई महापालिकेतल्या स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येत पाचनं वाढ करण्यात आली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यासंदर्भातलं एक विधेयक आज विधान परिषदेत मांडलं. त्यामुळं मुंबई महापालिकेतल्या स्वीकृत नगरसेवकांची संख्या आता पाचऐवजी दहा होणार आहे. इतर महापालिकांमध्ये निवडून आलेल्या सदस्य संख्येच्या दहा टक्के किंवा दहा सदस्य यापैकी कमी असणारा आकडा स्वीकृत नगरसेवकांसाठी लागू करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram