SSC EXAM : दहावीसाठी राज्य सरकारच्या मूल्यमापन पद्धतीवर काही शिक्षकांचा आक्षेप

Continues below advertisement

मुंबई : दहावीच्या परीक्षांसाठी (10th Exam) राज्य सरकारनं (Maharashtra State) आता गाईडलाइन्स ठरवल्या आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. याचा अर्थ परीक्षेविना पास होण्याचा मार्ग यंदाच्या 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोकळा झालाय. 

मात्र, आता अंतर्गत मूल्यमापनासाठी काही शाळा तयार जरी असल्या, तरी काही शाळांनी सुरवातीला तयारी तर दाखवली मात्र आता अंतर्गत मूल्यमापणामध्ये अनेक प्रश्न शिक्षकांमध्ये निर्माण झालेत. ज्या शाळांनी अंतर्गत मूल्यमापन केलेच नाही अशा शाळांतील विद्यार्थ्यांचं आता काय होणार? अशा अनेक शाळा आहेत. त्यातील 15 ते 20 टक्के विद्यार्थी वर्षभर संपर्कात नाहीत त्यांना कसा उत्तीर्ण करायचे असे अनेक प्रश्न शिक्षकासमोर आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram