Palghar : तेलाचा साठा असलेला तराफा खडकावर आदळला, समुद्रात तेलगळती झाल्याने मासेमारीवर परिणाम
Continues below advertisement
तौक्ते चक्रीवादळामुळे 18 मे रोजी अलिबाग येथील भरकटलेलं जहाज पालघर मधील वडराई समुद्रकिनार्यालगतच्या खडकावर आदळलं असून हे जहाज तब्बल अकरा दिवसानंतर ही याच ठिकाणी आहे . मात्र हे जहाज खडकावर आदळल्याने या जहाजातील अनेक भाग हे फुटले असून या जहाजातील डिझेल आणि ऑइल याची गळती सध्या समुद्रात सुरू असून या गळतीमुळे समुद्र किनाऱ्यालगत तेलाचे तवंग तयार होऊ लागले आहेत . याचा विपरीत परिणाम पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगत होणाऱ्या मासेमारीवर होऊ लागला आहे . समुद्रात या जहाजातून मोठ्या प्रमाणावर ऑइल आणि डिझेल ची गळती सुरू असून समुद्रकिनाऱ्यालगत जाळ्याच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या मासेमारी वर याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत . या महाकाय जहाजात 80 हजार लिटर पेक्षाही अधिक डिझेल असल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांकडून देण्यात आली आहे. या जहाजाचे अनेक भाग हे निकामी झाले असून या होणाऱ्या गळतीमुळे परिसरातील समुद्रकिनाऱ्यांवर तेलाचे तवंग निर्माण होऊ लागले आहेत .
Continues below advertisement