Sharad Pawar : महिलांनो रस्त्यावर उतरा, केसेस टाकल्या तरी हरकत नाही, सरकार बदलल्यावर केसेस हटवू

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार (Sharad Pawar NCP) महिला मेळावा (NCP Mahila Melava) आज मुंबईत पार पडला. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, (Rohini Khadse) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. शरद पवार यांनी महिलांना अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं. "समाजात चुकीचं काही दिसलं तर रस्त्यावर उतरा, सरकार केसेस टाकेल, पण तरीही घाबरु नका. सरकार बदलत असतं, आपण त्या केसेस मागे घेतो", असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram