Sanjay Raut ED Inquiry : राऊतांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त, घराबाहेरुन माझाचा रिपोर्ट
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे... गेल्या ५ तासांपासून ईडीकडून राऊतांची चौकशी सुरु आहे. पत्राचाळा घोटाळाप्रकरणी ही चौकशी सुरु असल्याचे समजतंय. ईडीच्या सात अधिकाऱ्यांकडून राऊतांच्या घरी झाडाझडती सुरु असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील 'मैत्री' बंगल्यात ठाण मांडून आहेत. त्या ठिकाणी संजय राऊत यांची चौकशी सुरू असताना दुसरीकडे दादर परिसरातील राऊतांच्या फ्लॅटमध्ये देखील ईडीचं पथक दाखल झाले आहे. त्याशिवाय, मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.