रश्मी शुक्लांची हायकोर्टात याचिका,फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांना कठोर करवाई करू न देण्याची मागणी
Continues below advertisement
मुंबई : फोन टॅपिंग आणि काही गोपनीय कागदपत्रं लिक केल्याच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यात आपल्याविरोधात कठोर कारवाई करु नये. तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी प्रमुख मागणी या याचिकेतून केली आहे.
Continues below advertisement