#Lockdown Satara सातारा जिल्ह्यात आज रात्रीपासून कडक लॉकडाऊन, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची घोषणा
Continues below advertisement
राज्यभर अंशता लॉकडाऊन जाहिर झाल्यानंतरही कोरोनाची आकडेवारी ही दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत होती. गेल्या आठवडाभर दररोज सुमारे 2 हजार 500 च्या आसपास कोरोना बाधितांची नोंद होताना पहायला मिळत होती. तर गेल्या आठवड्यात दररोज बाधित मृत्यूचा आकडाही दिवसेंदिवस वाढतानाचे चित्र दिसत होते. गेल्या आठवड्यात तब्बल 16 हजार 763 कोरोना बाधितांची नोंद झाली. तर जवळपास 500 च्या आसपास बाधितांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत कडक लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे मत असंख्य सातारकरांचे होते. त्यात सातारा कोविड डिफेन्डर गृपच्या वतीनेही कडक लॉकडाऊनची मागणी करण्यात आली होती.
Continues below advertisement