Phone Tapping | रश्मी शुक्ला सरकारच्या रडारवर?

परमवीर सिंह यांच्या पत्रानंतर अखेरीस महाविकास अघडी आक्रमक झाली आहे..विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाला उत्तर द्यायला सगळे मंत्री एकत्र आल्याचे चित्र आहे. फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यात दर दिवशी खळबळजनक माहिती समोर येण्याचं सत्र सुरु असतानाच कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग करताना गृहसचिवांची परवानगी घेतलीच नव्हती असा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. यामध्ये अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले असा दावाही त्यांनी केला. त्यामुळं आता रश्मी शुक्ला सरकारच्या रडारवर आहेत का, असाच प्रश्न उपस्थित होत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola