Rahul Shewale SIT : राहुल शेवाळे यांच्या SIT चौकशीची उपसभापतींकडून घोषणा ABP Majha
abp majha web team
Updated at:
22 Dec 2022 08:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार वाद पाहायला मिळत आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन गंभीर आरोप केल्यानंतर राज्याच्या विधानसभेत ठाकरे गटानं गदारोळ केला. शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य करताच आता राज्यात विधान परिषदेत ठाकरे गटाकडून शेवाळेंच्याच एसआयटी चौकशीची मागणी केली गेली आहे. शेवाळे यांच्या विरोधात एका महिलेनं केलेल्या गंभीर आरोपांप्रकरणी संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी आमदार मनिषा कायंदे यांनी विधानपरिषदेत केली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कायंदे यांची मागणी मान्य करत एसआयटी चौकशीचे निर्देश दिले आहेत.