Drug Case | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीकडून समन्स, चौकशी सुरु
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने समन्स पाठवलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर करण सजनानीच्या चौकशीदरम्यान समीर खान यांचं नाव समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर एनसीबीने समीर खान यांना समन्स पाठवलं. त्यानुसार समीर खान आज सकाळी एनसीबी कार्यालयात हजर राहिले असून त्यांची चौकशी सुरु आहे.