Mumbai Corona Vaccines Delivered | कोरोनाविरोधातील 'ब्रह्मास्त्र' कोविशिल्ड लस मुंबईत दाखल

Continues below advertisement

Mumbai Corona Vaccines Delivered : सीरमची कोविशिल्ड लस मुंबईत दाखल झाली आहे. पहाटे साडेपाच वाजता लसीचा पहिला साठा मुंबईत पोहोचला आहे. मुंबईला पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटकडून 1 लाख 39 हजार 500 लसीचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मुंबईत कोविशिल्ड लस दाखल झाल्यानंतर आता 9 रुग्णालयातील केंद्रांवर त्यांच वितरण होणार आहे. मुंबईतील केईएम, सायन, नायर, व्हीएन. देसाई, भावा, राजावाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, बीकेसी जम्बो सेंटर याठिकाणी लसीकरण होणार आहे.

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या अधिक होती. तसेच सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या असणाऱ्या शहरांच्या यादीत महाराष्ट्रासह देशात मुंबई पहिल्या क्रमांकावर होती. तसेच आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबईतील धारावीतही कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधित होता. सध्या मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. मुंबईचा सध्याचा रिकव्हरी रेट हा 93 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी हा 365 दिवस इतका आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram