NAS Survey : मुंबईतील शाळांमध्ये NASचे सर्वेक्षण, शैक्षणिक धोरण जाणून घेण्यासाठी घेतला जातो आढावा
केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत देशभरात आज राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS सर्वे) केले जात आहेत. सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळांमध्ये शहरी भागात विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत असून या सर्वेक्षणासाठी राज्यातील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या एकूण 7330 शाळांमधील 2 लाख 34 हजार विद्यार्थ्यांची निवड केंद्र शासनामार्फत करण्यात आली आहे. अशा प्रकारचे सर्वेक्षण दर तीन वर्षानंतर केले जातं यामध्ये शैक्षणिक धोरण ठरविण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता जाणून घेण्यासाठी ती तपासण्यासाठी देशपातळीवर हे सर्वेक्षण केले जातात.