Mumbai Vaccination : मुंबई लसीकरणात महत्त्वाचा टप्पा गाठणार, पहिल्या डोसचं 100% लसीकरण पूर्ण होणार
मुंबई लसीकरणात आज महत्त्वाचा टप्पा गाठणार आहे. मुंबईत आज पहिल्या मात्रेचं १०० टक्के लसीकरण पूर्णत्वास जाणार आहे. कालपर्यंत मुंबईत ९९.९९ टक्के लसीकरण पूर्ण झालं होतं. १०० टक्के लसीकरणासाठी केवळ ८६० जणांचं लसीकरण बाकी आहे. त्यामुळे आज सकाळी काही तासांतच मुंबईत पहिल्या डोसचं १०० टक्के लसीकरण होईल. मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांतील नागरिकांनीही मुंबईत डोस घेतला असल्यानं मुंबईतील काही नागरिक अजूनही पहिल्या डोसपासून वंचित आहेत. असं असलं तरी दिल्ली, बंगळुरू, चेन्नई या महानगरांच्या तुलनेत मुंबईनं लसीकरणात आघाडी घेतली आहे. तर मुंबईत ६५ टक्के नागरिकांनी लशीचे दोन्ही डोस घेतलेत.