Mumbai Vaccination Drive : मुंबईत दोन दिवस बंद असलेलं लसीकरण आजपासून पुन्हा सुरू ABP Majha
वेदांत नेब, एबीपी माझा
Updated at:
21 Aug 2021 12:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलशीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे. मुंबईत दोन दिवसांपासून बंद असलेलं लसीकरण आज पूर्ववत झालंय. परवा रात्री मुंबईला १ लाख ६० हजारांवर लशींचा साठा उपलब्ध झाला. या लशींचं वितरण सर्व सरकारी केंद्रात करण्यात आल्यानं आजपासून लसीकरण मोहीम पुन्हा सुरू झाली आहे. १६ जानेवारीला लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत मुंबईतील ९० लाख अपेक्षित लाभार्थ्यांपैकी ८२ लाख ४३ हजार नागरिकांना लस मिळाली आहे. नोव्हेेंबर अखेरपर्यंत सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य मुंबई महापालिकेनं ठेवलं आहे.