Mumbai : Mithi नदी स्वच्छ करण्यासाठी 500 कोटी रुपयांचा प्रकल्प,मलजल रोखण्यासाठी 6 किमी बोगदा बांधणार
Continues below advertisement
मुंबईला 26 जुलै 2005 च्या महापुरात बुडवणाऱ्या मिठी नदीच्या शुद्धीकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई महापालिकेनं मंजूर केलाय. मिठी नदी स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आता तब्बल 500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मिठीच्या प्रवाहात जाणारे मलजल रोखून नदीतील प्रदूषण रोखलं जाणार आहे. कुर्ला येथे नदीत जाणारे दोन नाल्यांमधील मलजल भूमिगत 6 किमी लांबीच्या भुयारातून धारावीतील प्रक्रिया केंद्रात आणले जाणार आहे. 500 कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.
Continues below advertisement