Mumbai Traffic Jam Andheri : मुंबईतील Western Express Highway वर खड्ड्यांमुळे वाहतुक कोंडी
तब्बल दोन वर्षांनी दहीहंडीचा थरार यावर्षी पाहायला मिळणार आहे. कोरोनाच्या निर्बंधमुक्तीनंतर आज गोकुळाष्टमीच्या सणाचा उत्साह आहे. विशेषतः उद्या दहीहंडीसाठी प्रमुख आयोजकांनी कंबर कसलीय. राजकीय नेत्यांनी पुन्हा एकदा दहीहंडीचं आयोजन केल्यानं मुंबई, ठाण्यात जोरदार राजकीय काला पाहायला मिळणार आहे. यावेळी गोविंदांच्या थराराबरोबरच सेलिब्रिटींच्या कलेचा आनंदही लुटता येणार आहे. गोविंदाचे नियम पाळून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची तयारीही गोविंदा पथकं करत आहेत.