Entrance Exams | प्रवेश प्रक्रियेसाठी आर्टिफिशियल इंटलिजन्सचा वापर; मुंबईतील झेवियर्स कॉलेजचा निर्णय
Continues below advertisement
मुंबईतील नामवंत झेवीयर्स महाविद्यालयात कोरोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुलभ कशी होईल याचा विचार केला गेला आहे. त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञनाचा वापर करण्याचा झेवीयर्स महाविद्यालयाने ठरवलं असून देशातल्या कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षा देऊन या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. बीएमएम, बीएमएस, एमएस्सी, एम सायकॉलॉजी आणि इतर दोन अभ्यासक्रमासाठी एक अजेंन्सी नेमून त्याद्वारे जुलै महिन्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर करून त्यात सॉफ्टवेअरमध्ये डोळ्यांच्या व इतर हलाचलीद्वारे कमांड देऊन विद्यार्थी लॉग इन करू शकतील व ही प्रवेश परीक्षा सुलभतेने देऊ शकतील शिवाय यासाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट सुद्धा ऑनलाइन सबमिट करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
Continues below advertisement