Mumbai Omicron : मुंबईतल्या धारावीवरही ओमायक्रॉनचं सावट; महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात... ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Dec 2021 12:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतल्या धारावीवरही ओमायक्रॉन व्हेरियंटचं सावट आहे. पूर्व आफ्रिकेतील टांझानियातून धारावीत आलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. या व्यक्तीचे स्वॅब नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. या अहवालाची आता प्रतीक्षा आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या व्यक्तीला मुंबईत अंधेरी इथल्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची सध्या तपासणी सुरु आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या संदर्भात काय माहिती दिलीय पाहूया...