Juhu | कोरोना रुग्णसंख्यावाढ होत असतानाही जुहू चौपाटीवर पर्यटकांची प्रचंड गर्दी
कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसागणित अधिकच फोफावू लागला आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून प्रशासनानं सर्वतोपरी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पण, नागरिकांना मात्र या साऱ्याचा विसर पडताना दिसत आहे. याचाच प्रत्यय येत आहे, मुंबईच्या जुहू चौपाटी येथील समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या गर्दीकडे पाहून.