Mumbai Corona Update : मुंबईमध्ये रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ, दिवसभरात 10,860 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
abp majha web team
Updated at:
04 Jan 2022 11:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या ही सातत्याने वाढतच आहे. राज्याची राजधानीमध्येही ही रुग्णसंख्या वेगाने वाढताना दिसत आहे. मुंबईत आज 10 हजार 860 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 654 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे 92 टक्क्यांवर पोहोचलं आहे. सोमवारच्या तुलनेत आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून तो चिंतेचा विषय आहे.