Collage Reopen : मुंबईतील अनेक नामांकित महाविद्यालयं सुरु झालीच नाहीत, नियोजनाअभावी ऑफलाईन वर्ग बंदच
राज्याच्या विविध भागात आज महाविद्यालयं सुरु झाली आहेत. मात्र, मुंबईतील अनेक नामांकित महाविद्यालयं मात्र, सुरु झालेलीच नाहीत. यामध्ये रुईया, एचआर, जयहिंद आणि झेवियर्स यांसारख्या महाविद्यालयांचा समावेश आहे. नियोजन न झाल्यानं पदवी अभ्यासक्रमाचे वर्ग सुरु झाले नसल्याचं कळतंय.