Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 20 ऑक्टोबर 2021 बुधवार : ABP Majha

Continues below advertisement

स्मार्ट बुलेटिन | 20 ऑक्टोबर 2021 | बुधवार | एबीपी माझा

दीड वर्षांनंतर कॉलेज कॅम्पस गजबजणार, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी महाविद्यालयांकडून जय्यत तयारी

आर्यन खानच्या जामीनावर आज फैसला, 17 दिवस कोठडीत काढल्यानंतर सुटका होणार की कारागृहातच मुक्काम वाढणार याकडे लक्ष

चॅनेल्स पाहण्यासाठी 50 टक्के अधिक खर्च करावा लागणार, 'ट्राय'च्या नवीन दर आदेशाच्या अंमलबजावणीमुळे किंमती वाढणार

कोरोनाविरोधातील लढाईत भारताची मोठी कामगिरी, आज 100 कोटी लसवंतांचा टप्पा पूर्ण होण्याची शक्यता, केंद्र सरकार ऐतिहासिक क्षण साजरा करणार
 
मुंबईतल्या सायन परिसरातून 21 कोटींचं हेरॉईन जप्त, ड्रग्ज पेडलर महिला गजाआड, मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

सेक्स टूरिझम रॅकेटचा भंडाफोड; मुंबई क्राइम ब्रांचची कारवाई, दोन महिला अटेकत

नागपुरातील कळमना परिसरात निर्माणधीन फ्लायओव्हरचा गर्डर कोसळला, वाहतूक सुरु नसल्यानं मोठा अनर्थ टळला

काँग्रेसला रामराम ठोकणारे कॅप्टन अमरिंदर सिंह नवीन पक्ष स्थापन करणार, शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्याच्या अटीवर भाजपशी हातमिळवणीची शक्यता

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये टेकऑफ नंतर विमान दुर्घटना, अपघातानंतर लागलेल्या आगीत विमान जळून खाक, सर्व 21 प्रवाशांना वाचवण्यात यश

बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारामागे तालिबान आणि पाकिस्तानचा हात, बांग्लादेशच्या संसदेच्या अध्यक्षांकडून संशय व्यक्त
 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram