56 वाले मुख्यमंत्री, 54 वाले उपमुख्यमंत्री होतात तर 119 वाले राज्यसभेत जाणारच : चंद्रकांत पाटील

Continues below advertisement

मुंबई : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी काँग्रेसनं रजनी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपनं संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे.  राज्यसभेसाठी भाजपकडून संजय उपाध्याय यांच्या उमेदवारीवरुन बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपाध्याय राज्यसभेत जातीलच असा दावा केला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं. 56 वाले मुख्यमंत्री होऊ शकतात तर 54 वाले उपमुख्यमंत्री आणि 44 वाले महसूलमंत्री होऊ शकतात. तर 106 आणि 13 अपक्ष असे 119 वाले राज्यसभेत का जाणार नाहीत. संजय उपाध्याय राज्यसभेवर जाणारच असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. 

सेना-राष्ट्रवादीत 'खंजीर' वॉर? शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत; शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीतेंचं वक्तव्य

चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपकडे 106 आणि अपक्ष मिळून 119 संख्याबळ आहे.  काही इतर लोकांची ही साथ आम्हाला मिळू शकते. त्यामुळे निवडणुकीत संख्याबळ गाठता येईल, असा दावा देखील त्यांनी केला आहे.राज्यपाल-मुख्यमंत्री लेटर वॉरवर चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील जनता हा रोजचा खेळ पाहत आहे.  राज्यपाल हे प्रमुख आहेत, त्यांच्या सहीने विधानसभा बोलवता येते.

चंद्रकांत पाटलांची किंमत सव्वा रुपयाच- संजय राऊतांचा निशाणा  

संजय राऊतांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी, चंद्रकांत पाटलांचा राऊतांना चिमटा 

 संजय राऊतांनी माझ्यावरील मानहानीची रक्कम वाढवावी. माझी किंमत सव्वा रुपया नक्कीच नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आपल्या संस्कृतीत एकमेकांना चिमटे घेतले जातात, मात्र जखम होत नाही. माझी किंमत त्यांनी ठरवावी मात्र सव्वा रुपया नक्की नाही. मला संधी मिळेल त्यावेळी सातत्याने बोलणारे, सातत्याने लिहिणारे असा अवार्ड द्यायचा झाला तर मी संजय राऊतांना देईल. शिवसेनेचं दुसरं कुणी काही बोलत नाही. फक्त संजय राऊतच बोलतात. त्यासाठी तयारी करावी लागते, असंही ते म्हणाले. 

संजय राऊतांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी, चंद्रकांत पाटलांचा राऊतांना चिमटा 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram