मुंबै बँकेची चौकशीविरोधातली याचिका हायकोर्टानं फेटाळली, प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं
Continues below advertisement
Mumbai Bank News : मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेची याचिका फेटाळून लावत हायकोर्टानं त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षातील बँकेच्या आर्थिक व्यवहारांच्या अनियमिततेची चौकशी करण्याचा सहकार विभागाचा मार्ग मोकळा झाला आहे. चौकशी करण्याच्या या निर्णयाला मुंबै बँकेच्यावतीनं हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्यापुढे यावर सुनावणी झाली असता बँकेची ही याचिका फेटाळून लावण्यात आली. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे बँकेचे सर्वोसर्वा आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.
Continues below advertisement