Buldhana Urban : बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्या मुख्यालयात आयकर पथक ठाण मांडून
Continues below advertisement
Buldhana Urban Bank : आशियातील सर्वात मोठी पतसंस्था असणाऱ्या बुलडाणा अर्बनच्या मुख्यालयात काल सलग दुसऱ्या रात्रीही झाडाझडती झाली. मंत्री अशोक चव्हाणांशी संबंधित चार साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाप्रकरणी आयकर खात्याकडून बुलडाणा अर्बनची चौकशी सुरु आहे. आयकर खात्याच्या 11 जणांचं विशेष पथक परवापासून बुलडाणा अर्बनच्या मुख्य शाखेतील सर्व कागदपत्रांची तपासणी करत आहेत. 11 जणांच्या विशेष पथकातील 6 अधिकारी दिल्लीचे असून त्यात IRS दर्जाचे अधिकारी असल्याची माहिती मिळत आहे.
Continues below advertisement