Mumbai : मुंबै बँकेचे संचालक विष्णू घुमरे कनिष्ठ आवेदक पदावरून निलंबित ABP Majha

Continues below advertisement

मुंबई बँकेचे संचालक विष्णू घुमरे यांना मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कनिष्ठ आवेदक पदावरून निलंबित करण्यात आलंय. घुमरे यांनी महापालिकेत काम करत असताना कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक लढवल्याचं समोर आलंय. घुमरे चिंतामणी औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासद पदावर देखील कार्यरत आहेत. घुमरे संचालक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी केलेल्या मतदानामुळे दरेकर यांंचं पॅनल मुंबै बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी हरलं होतं. त्यावरूनही राजकारण रंगलं. उपमुख्यमंत्री अजित पवार हे घुमरे यांना वाचवत आहेत, असा आरोप दरेकर यांनी केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram