मोटरमनच्या मृत्यूमुळे मध्य रेल्वेचा खोळंबा झालाय. आतापर्यंत ८४ लोकल रद्द करण्यात आल्या असून रात्रीपर्यंत आणखी लोकल रद्द होण्याची शक्यता आहे.. ज्या मोटरमनचा काल मृत्यू झाला त्याच्याकडून रेड सिग्नल असतानाही गाडी पुढे गेली. ही चूक झाल्यानंतर काही वेळाने याच मोटरमनचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. मात्र हा मृत्यू अपघाती नसून कारवाईच्या भितीपोटी केलेली आत्महत्या असल्याचं म्हणणं रेल्वे कर्मचारी युनियचं आहे..