Maharashtra colleges Reopen :महाविद्यालयं 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार,दादरच्या कीर्ती कॉलेजमधून आढावा

 राज्यात चार ऑक्टोबर रोजी शाळांची घंटा वाजायला पुन्हा सुरुवात झाली. आता येत्या २० ऑक्टोबर म्हणजे अगदी परवापासूनच राज्यातील महाविद्यालयं सुरु होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठांतर्गत येणारी महाविद्यालयं सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वं जारी करण्यात आली आहेत. मुंबईतली महाविद्यालयं सुरु होण्यासाठी आता अवघा एक दिवस उरल्यामुळं खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहे. कॉलेजमधल्या किती विद्यार्थ्यांचं लसीकरण झालं आहे ? किती विद्यार्थी ऑफलाइन वर्गांमध्ये येऊ शकतात ? आदी प्रकारचं सर्वेक्षण करून त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे. 

दादरच्या कीर्ती कॉलेजमध्ये कशी तयारी करण्यात आली याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी वेदांत नेब यानं

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola