तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अभिमान वाटेल असं काम करुन दाखवेन, समुपदेशनावेळी आर्यनचं NCB ला आश्वासन
Mumbai Drug Case : क्रूझ ड्रग्स केस प्रकरणी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आर्यन खानला (Aryan Khan) मुंबईच्या सेशन कोर्टाच्या विशेष NDPS कोर्टाकडून जामीन मिळणार की, नाही? याचा निर्णय 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आर्यन खानसह इतर सर्व आरोपींची रवानगी आर्थर रोडच्या कारागृहात करण्यात आली आहे. आर्यन खानने एनसीबी (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी विश्वास दिला आहे की, आतापासून मी नवं आयुष्य सुरु करणार आणि चांगलं काम करुन नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करिन.