Ganeshotsav 2021 : आधी अँटीजेन, मगच विसर्जनाला परवानगी! ठाणे महापालिकेचा निर्णय
गणेशोत्सवादरम्यान कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विसर्जन स्थळी महापालिकेकडून अँटिजन टेस्ट केली जाणार आहे. तूर्तास ठाणे महापालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला असला, तरी याचं अनुकरण इतर महापालिकांकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. ठाणे महानगरपालिका गणेशविसर्जन ठिकाणी स्वतंत्र चाचणी केंद्र उभारणार आहे. तसेच डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची पथकंही विसर्जनस्थळी सज्ज असणार आहेत.
Tags :
Coronavirus Thane Ganeshotsav Thane Municipal Corporation Coronavirus Covid-19 Ganeshotsav 2021