Deepali Sayyad FULL : ठाकरे - शिंदेची भेट ते संजय राऊतांना प्रत्युत्तर, काय म्हणाल्या दिपाली सय्यद?
abp majha web team
Updated at:
17 Jul 2022 03:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDeepali Sayed : सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडी दरम्यान मी काही जणांच्या भेटी-गाठी घेतल्या. माझं दोन्ही ठिकाणी बोलणं झालं आहे. त्यातून मला जे जाणवलं तेच मी बोलले असल्याचे मत शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी व्यक्त केलं. प्रत्येकाच्या मनात एकत्र येण्याची इच्छा आहे. हे मला जाणावले आहे. तेच मी ट्वीटवर लिहलं असल्याचे सय्यद म्हणाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांनी पुढाकार घ्यायला हवा असेही त्या म्हणाल्या. तुटलेलं घर पुन्हा एकत्र यावं हीच सर्वांची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितलं.