Cyclone Tauktae : कुर्ला कामगार नगर परिसरात भलं मोठं झाडं कोसळलं, चेंबूरकडे जाणारा रस्ता बंद

तोक्ते चक्रीवादळाच्या पाऊलखुणा आज मुंबईत सर्वत्र पाहायला मिळत आहेत. रात्रभर सुरू असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडलेत. कुर्ला कामगार नगर परिसरातील अनेक जुने डेरेदार वृक्ष कोसळून चेंबूरकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. एक झाड रस्त्यालगदच्या गाडीवर कोसळल्यामुळे गाडीचं बरंच नुकसान झालंय. तर पिपंळाचं एक झाड वाऱ्याच्या प्रचंड वेगानं मुळासकट उखडून नजीकच्या एका पत्र्याच्या शेडवर पडलंय सुदैवानं यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. हीच अवस्था मुंबईत अनेक ठिकाणी असल्यानं आता मुंबईला पुन्हा पूर्वपदावर आणण्याचं खरं आव्हान पालिका कर्मचाऱ्यांपुढे असणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola