मुख्यमंत्री पिनराईंनी केरळचं मंत्रिमंडळ बदललं, पूर्वीचे सर्व सहकारी मंत्रिमंडळाबाहेर, नव्या चेहऱ्यांना संधी
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ अर्थात डाव्या पक्षाच्या सरकारला पुन्हा एकदा सत्ता आली आहे. केरळमध्ये मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना स्थान दिली आहे. कोविडच्या यशस्वी हाताळणीबद्दल ज्या के के शैलजा यांचं जगात कौतुक झालं, त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान नाही.