मुंबईतील 50 टक्के लसीकरण केंद्रे लसपुरवठ्याअभावी बंद, मुंबईत दीड दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा
मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
08 Apr 2021 02:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएक दिवसात मुंबईला लस मिळाली नाही तर परवा संपूर्ण मुंबईतील लसीकरण ठप्प होणार आहे. उद्या सर्व खाजगी केंद्रे तर परवा सर्व शासकीय केंद्रे सुद्धा लसपुरवठ्याअभावी बंद होणार आहेत. आज मुंबईतील 50 टक्के लसीकरण केंद्रे लसपुरवठ्याअभावी बंद आहेत. उद्या सर्व खाजगी लसिकरण केंद्र बंद होतील, तर परवापर्यंत संपूर्ण मुंबईतील लसीकरण ठप्प होईल. मुंबईतील 26 खाजगी लसीकरण केंद्र बंद झाली तर, 24 केंद्र आज संधयाकाळपर्यंत बंद होतील. मुंबईत एकूण 120 सेंटर्स आहेत, त्यांपैकी 73 खाजगी सेंटर्स आहेत. यामधील एच.एन.रिलायन्स, ब्रिच कॅन्डी, हबीब, भाटीया, एलिझाबेथ, लायन हॉस्पिटल, सिटी केअर, लाईफलाईन, भाभा हॉस्पिटल ही लसीकरण केंद्र बंद झाली आहेत.