CM Eknath Shinde Yoga Day :आम्ही खड्डे मुक्त मुंबई केली; आता खड्ड्यांवर गाणं करण्याची वेळ येणार नाही

Continues below advertisement

CM Eknath Shinde Yoga Day :आम्ही खड्डे मुक्त मुंबई केली; आता खड्ड्यांवर गाणं करण्याची वेळ येणार नाही सकाळी 6 पासून योगाचा कार्यक्रम सुरु आहे. ठाण्यात खुप पाऊस आहे मुंबईत पाऊस नाही. आज अतिशय चांगलं सुशोभीकरण करण्यात आलं आहे. पद्मश्री चुडासामा यांच्या स्मरणार्थ करण्यात आलं आहे. मुंबई स्वच्छ सुंदर हरित करण्यासाठीं डीप क्लीन ड्राईव्ह उपक्रम हाती घेण्यात आला आहे.फ्लायओहर ब्रीज खाली सुशोभीकरण करण्यात आलं आहे. इथ एक टॉयलेट आहे ते काढून टाका आणि तिथं असच एक सुशोभीकरण करा. भायखळा रेल्वे स्टेशनला युनोस्कच अवॉर्ड मिळालं आहे. आम्ही खड्डे मुक्त मुंबई केली आहे. आता खड्ड्यांवर गाणं करण्यची वेळ येणार नाही योगा माणसाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनायला हवं मुंबईचे माजी नगरपाल (शेरीफ) पद्मश्री नाना चुडासामा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मरिन ड्राईव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलाखाली करण्यात आलेल्या सुशोभीकरणाचे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जागतिक योग दिनी म्हणजेच आज करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, आय लव्ह मुंबई आणि जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या वतीने तसेच प्राइम सेक्युरिटीज यांच्या सहकार्याने प्रिन्सेस स्ट्रीट पुलाखाली विविध प्रकारच्या योगमुद्रा कलाकृती साकारण्यात आले आहेत. योगसंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने आय लव्ह मुंबई आणि जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशनच्या शायना एन.सी. यांच्या नेतृत्वाखाली प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलाखाली विविध योगमुद्रा कलाकृती साकारण्यात आले आहेत. बाया डिझाईनच्या शिबानी दास गुप्ता यांनी ही शिल्पं साकारली आहेत. या उदघाटणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram