Mumbai Bank : मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर आणि सुरेश धस अडचणीत येण्याची शक्यता

Continues below advertisement

Mumbai Bank :  मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) अडचणीत येण्याची शक्यता आहे.  दरेकर आणि धस दाम्पत्यावर आर्थिक फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे राज्याच्या सहकार खात्याचे आदेश दिले आहेत. बोगस दस्ताऐवजांच्या आधारे तब्बल 27 कोटींचे कर्जवाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरेकर यांच्यासह धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याच्या सहकार खात्याने दिले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram