BMC Waterpipe Repair : मुंबई मनपा करणार जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम, 'या' दिवशी 10 टक्के पाणी कपात
Continues below advertisement
मुंबई महानगरपालिकेने या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम ९ मार्चला सकाळी १० वाजल्यापासून ११ मार्चला सकाळी १० वाजेपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे ९ मार्चला सकाळी १० वाजल्यापासून ११ मार्चला सकाळी १० पर्यंत मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरांमधील काही परिसरात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. नागरिकांनी आदल्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
Continues below advertisement