Nashik Onion Holi : कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर कांद्याची होळी करण्याची वेळ : ABP Majha
Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर कांद्याची होळी करण्याची वेळ आली आहे.. येवला तालुक्यातील काही शेतकरी आज सकाळी ११ वाजता होळी साजरी करून नंतर कांद्याचा पिकाला अग्निडाग देणार आहेत. एकीकडे कांद्याला कवडीमोल भाव मिळतोय, आणि दुसरीकडे सरकार केवळ घोषणांचा पाऊस पाडतंय. बाजार समित्यांमध्ये येऊन नाफेड कांदा खरेदी करेल अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात केली.. मात्र अजूनही नाफेडची खरेदी सुरू झालेली नाही. कांद्यातून चार पैसे कमवणं तर सोडाच पण पिकवण्याचा आणि वाहतुकीचा खर्चही निघत नाहीये.. आणि म्हणूनच या शेतकऱ्यांनी आपलं कांद्याचं पीक जाळून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement